शिरूर – कोरेगाव भिमा दंगलीबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला असून दंगलीदरम्यान सरकारमधील एक मंत्री त्याच ठिकाणच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन डोकावून पाहत होता असा आरोप अजितदादांनी केला आहे. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा शिरुरमध्ये पोहचली असून यादरम्यान अजितदादा बोलत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचं केंद्रात आणि राज्यात सरकार आणा, सरकार आल्यानंतर राज्यात बैलगाड़ा शर्यत सुरु केली नाही तर अजित पवार म्हणून नाव सांगणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान कोरेगावमधील दंगल पेटली असताना सध्याच्या सरकारचा एक मंत्री त्याच ठिकाणच्या एका इमारतीवरुन डोकावून पाहत होता, अरे हिंमत होती तर दंगल जाऊन थांबवायची होती ना असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भरत्या थांबविण्यात आल्या आहेत, त्याचे कारण कळत नाही, बँकात काही गैर झालं असेल तर चौकशी करायला हवी होती परंतु ती केली जात नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS