शिवसेनेला संपवण्याचं काम भाजपकडून सुरु आहे –रामदास कदम

शिवसेनेला संपवण्याचं काम भाजपकडून सुरु आहे –रामदास कदम

मुंबई – शिवसेनेला संपवण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याची जोरदार टीका रामदास कदम यांनी केली आहे. ज्या शिवसैनिकांनी रास्तारोको केले उलट त्यांच्यावर पोलीस कार्यालय फोडताना जे गुन्हे दाखल केले गेले होते तीच कलमे इथे लावली असून एकीकडे युतीचा हात पुढे करण्याचे काम चालू आहे तर दुसरीकडे अहमदनगर प्रकरणाच्या माध्यमातून सेनेला संपवण्याचे काम सुरू आहे. सेनेचे मते घ्यायची आणि दुसरीकडे सेनेचे खच्चीकरण करायचे अशी भूमिका भाजपाने घेतली असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नगरमध्ये कायदा सुव्यवस्था अजिबात नसून त्याठिकाणी बोजवारा उडालेला आहे. म्हणून आज मुख्यमंत्र्यांकडे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची हकालपट्टी करण्याची विनंती केली असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच तिथे जे  पोलीस कार्यालय फोडले यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आत्तापर्यंत फक्त 20 लोकांना अटक झाली आहे प्रत्यक्षात लोकं 500 पेक्षा जास्त होती. पोलीस या लोकांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामदास कदम बोलत होते.

COMMENTS