दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार

दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार

मुंबई – राज्यातील काही मुलांना मराठी नीट वाचता येत नाही. सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजिक पवार यांनी केली आहे. तसेच हा निर्णय अत्यंत आवश्यक असून हा निर्णय घेतला, तरच भाषा टिकेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/968372581488308230

 

विधिमंडळात आज मराठी भाषा दिन साजरा करताना मराठी अभिमान गीताचे शेवटचे कडवे वगळण्यात आले. गीताचे गायन सुरु असताना अचानक माईक बंद झाला. हे कोणी मुद्दाम करत आहे का? याचे कंत्राट कोणाला दिले होते? यातून कोणाचा फायदा होत आहे?, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजितदादांनी केली आहे. तसेच मराठी भाषा व शाळांचे अस्तित्व सरकारच्या १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे धोक्यात आलं असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. आजच्या मराठी भाषा दिनी या शाळांचे संवर्धन करण्याचा निर्धार हीच कवी कुसुमाग्रज यांना खरी आदरांजली ठरेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS