अभिनेत्री श्रीदेवींची हत्याच झाली असणार – भाजप नेता

अभिनेत्री श्रीदेवींची हत्याच झाली असणार – भाजप नेता

नवी दिल्ली –  अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावरुन तर्कवितर्क लावले जात आहेत. श्रीदेवी यांची दुबईमध्ये हत्याच झाली असणार असं वक्तव्य भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. श्रीदेवी या हार्ड ड्रिंक्स घेत नाहीत हे सत्य असून अशातच त्यांच्या शरीरात अल्कोहल कुठून आलं असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला यामध्येही तथ्य नसून बाथटमध्ये त्यांना कोणीतरी ढकललं असणार असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तसेच श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पुन्हा चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचा दाऊद इब्राहिमसोबत संपर्क असल्याचंही स्वामी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS