माझी बहिण पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर आवडेल पण… – अजित पवार

माझी बहिण पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर आवडेल पण… – अजित पवार

मुंबई – ‘माझी बहिण सुप्रिया सुळे ही राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर मला आवडेल’, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. एका मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं असून माझी बहिण राज्याची प्रमुख झाली तर मला का नाही आवडणार?” पण सुप्रियाला राज्याच्या राजकारणात रस नाही. तिचं संपूर्ण लक्ष दिल्लीच्या राजकारणात आहे, त्यामुळे जर सत्तेत आलो तर त्यावेळी महत्त्वाचा निर्णय हा आमदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घेतील असेही अजितदादांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं. या दोघांचा विचार केला तर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे समर्थकही द्विधा मनस्थितीत असतात. काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांनीही आपण केंद्रात राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवारच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे दिसत आहे.

COMMENTS