हृदयातून करायचं ठरवलं तर होऊ शकतं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलले उदयनराजे !

हृदयातून करायचं ठरवलं तर होऊ शकतं, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलले उदयनराजे !

सातारा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानावर खासदार उदयनराजे अखेर बोलले असून त्यांनी राज यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक का होऊ शकत नाही, डोक्यातून नव्हे हृदयातून करायचं ठरवलं तर होऊ शकत नाही, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे. साता-याच्या दौ-यावर असताना ‘सत्तेत असणाऱ्यांनी शिवाजी महाराजांचे स्मारक होणार असे स्वप्न दाखवले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान सत्ताधा-यांनी दाखवलेलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, स्मारकाचे फक्त स्वप्न दाखवलं असल्याची टीका त्यांनी केली होती.  परंतु स्टेचू ऑफ लिबर्टी होऊ शकतो तर स्मारक का होणार नाही असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे माझा मित्र आहे, तो कोणत्या अँगलने बोलला हे माहीत नसून आपण सारे लोकशाहीतले राजे आहोत त्यामुळे स्मारक होईलच असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

 

COMMENTS