मुंबई – दुष्काळप्रश्नी अनेकांना सभागृहात बोलायचं होतं मात्र बोलू दिलं नाही. लोकशाहीची थट्टा या सरकारने लावली आहे. आम्हाला अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे होते. संपूर्ण राज्याचे लक्ष अंतिम आठवडा प्रस्तावावर असते मात्र सरकारने हा प्रस्ताव घेतलाच नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
दुष्काळप्रश्नी अनेकांना सभागृहात बोलायचं होतं मात्र बोलू दिलं नाही. लोकशाहीची थट्टा या सरकारने लावली आहे. आम्हाला अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे होते. संपूर्ण राज्याचे लक्ष अंतिम आठवडा प्रस्तावावर असते मात्र सरकारने हा प्रस्ताव घेतलाच नाही. – आ. @AjitPawarSpeaks
— NCP (@NCPspeaks) November 29, 2018
आरक्षणाबाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. सभागृहात मदत करायची ही आमची भूमिका होती. मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा. पण या आरक्षणासाठी अनेक लोकांचा जीव गेला, अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले. सरकारमधील मंत्री मात्र फेटे घालून जल्लोष करत होते अशी टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांवर केसेस आहेत पण सरकारने त्यावर काही निर्णय घेतला नाही. ज्या लोकांनी जीव गमावला त्यांना काही मदत केली नाही. भिमा-कोरेगाव प्रकरणात भिडेंवरचा गुन्हा मागे घेतला पण मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकार मागे घेत नसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.
COMMENTS