ब्रेकिंग न्यूज – अजित पवारांनी दिला राजीनामा!

ब्रेकिंग न्यूज – अजित पवारांनी दिला राजीनामा!

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा फोन अजित पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असल्याचं बागडे यांनी म्हटलं आहे. परंतु त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

COMMENTS