बारामती – कोणताही घोटाळा समोर आला की पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जातात. मग सुभाष देशमुख यांनाच वेगळा न्याय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. लोकमंगल संस्थेच्या माध्यमातून केलेला कर्ज घोटाळा, अग्निशमन केंद्राच्या जागेवरील बंगला अशी अनेक प्रकरणं असताना इतरांप्रमाणेच सुभाष देशमुख यांनाही पदावरुन दूर केलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीतील कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांनी आता भाजपला थारा देऊ नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. देशाचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाची थट्टा करतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी भाजपला थारा देऊ नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
COMMENTS