भाजपचा बालेकिल्ला मानला जाणा-या ‘या’ दोन लोकसभा मतदार संघात शिवसेनेचं आव्हान !

भाजपचा बालेकिल्ला मानला जाणा-या ‘या’ दोन लोकसभा मतदार संघात शिवसेनेचं आव्हान !

मुंबई – भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या दोन मतदारसंघात आता शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील दरी आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष युतीत भाजपचेच खासदार निवडून आले आहेत. परंतु आता या मतदार संघात पहिल्यांदाच शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी उमेदवारांची घोषणा करून प्रचारासही सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपपुढे शिवसेनेचेच मोठे आव्हान उभे ठाकणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.

दरम्यान आतापर्यंत जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदार संघात भाजप-सेना युतीचा ताबा असून याठिकाणी भाजपचेच वर्चस्व आहे. परंतु पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमधला वाद वाढल्यामुळे आता इतरही मतदारसंघात हिच स्थिती पहावयास मिळणार असल्याचं दिसून येत आहे. जळगाव आणि रावेर मतदार संघात शिवसेनेनं आतायपर्यंत भाजपला साथ दिली होती. परंतु आता मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपला आव्हान देऊन ही लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेनं इतरही पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.  त्यामुळे हेही चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान शिवसेनेतर्फे जळगाव लोकसभा मतदार संघात पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी निश्‍चित करण्यात आले आहे. त्यांनी मतदार संघात सभा घेवून धनुष्यबाणाचा प्रचारही सुरू केला आहे. तर रावेर मतदार संघातही शिवसेनेतर्फे चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांची उमेदवारी पक्षातर्फे अधिकृत मानली जात आहे. सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.त्यामुळे आता रावेर मतदार संघातही शिवसेना लढण्यास सज्ज झाली असल्याचं दिसून येत आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे ए. टी. नाना पाटील खासदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आव्हान असणार असून भाजपनं मात्र या दोन्ही ठिकाणी अजून उमेदवार निश्‍चित केलेला नाही. जळगाव लोकसभा मतदार संघात पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी उमेदवारीचा दावा केला असून विद्यमाना खासदार ए.टी.पाटील हे देखील तयारी आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील आगामी निवडणुकीत शिवसेना- भाजपमधील जोरदार सामना पहावयास मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS