पालिका निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढणार – भुजबळ

पालिका निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढणार – भुजबळ

नाशिक – ‘महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्या असे वाटत असले तरी प्रत्यक्ष जागा वाटपात किती तडजोड शक्य होईल, हे आज सांगणे कठीण आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाने आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून नंतरही एकत्र येता येते, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ वक्तव्य केले.

भुजबळ म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. अर्थात तीन पक्षांच्या एकजुटीपुढे भाजपचा टिकाव लागला नाही. सहा पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या पदरी फक्त एक जागा पडली. या निकालांनी भाजपला जबर हादरा बसला असताना आता ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर पालिका निवडणुकांत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढून नंतर एकत्र येऊ शकतात असे संकेत दिले.

COMMENTS