सोनिया गांधींचा लेटर बाॅंम्ब

सोनिया गांधींचा लेटर बाॅंम्ब

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतल जात नसल्याची तक्रार होत होती. आतापर्यंत राज्य पातळीवर काँग्रेसची नाराजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मांडली जात होती. पण आत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्लीतील हायकमांडनचा लेटर बाॅम्ब आला आहे

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून  राज्य सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. यावेळी खुद्द सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले. या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी हा हेतू असला तरी काँग्रेसच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. आता सोनिया गांधी यांनीच पत्र लिहून सरकार तयार होत असताना बनवलेल्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत काँग्रेसमध्ये नाराजी आहे हे अप्रत्यक्ष दिसून येत आहे. अगदी नुकतीच काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करुन तयारी देखील सुरु केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचा कस लागणार आहे.

दरम्यान, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावृत्ताचे खंड केले. हे पत्र सरकारमधील एका पक्षाने दुसऱ्या पक्षाशी साधलेला संवाद आहे. ही नाराजी नाही, असे सांगितले

 

COMMENTS