दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार, विरोधकांनी दर्शवला पाठिंबा!

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार, विरोधकांनी दर्शवला पाठिंबा!

नवी दिल्ली – दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली.

सर्वपक्षीय बैठकीत गृहसचिव राजीव गौबा, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारीही हजर होते. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला,
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, लेफ्टचे नेते डी. राजा, शिवसेना खासदार संजय राऊत, यांची उपस्थिती होती.

दरम्यान आजच्या बैठकीत त्रिसूत्री प्रस्तावालाही मंजूर देण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत सगळा देश आहे, त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS