शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब, लोकसभा, विधानसभेसाठी असा ठरला फॉर्म्युला ?

शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब, लोकसभा, विधानसभेसाठी असा ठरला फॉर्म्युला ?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-भाजपचं अखेर ठरलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेसाठी 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं असून लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला 23 तर भाजपला 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपने शिवसेना अडून बसलेल्या पालघरची जागाही शिवसेनेसाठी सोडल्याची आहे. येत्या दोन दिवसांत भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर युतीची घोषणा केली जाणार आहे. गेली काही दिवसांपासून शिवसेनेनं एकला चलोची भूमिका घेतली होती. वारंवार मित्रपक्ष असेल्या भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS