पिंपरी चिंचवड – लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणं, लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करण्याचं काम सर्व विरोधक आणि काँग्रेस करत असल्याची जोरदार टीका भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे. तसेच जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत आणि जाहीरनाम्यातून देखील भाजपने हे आश्वासन दिले नव्हते असंही अमर साबळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत चार वर्षांचा लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी अमर साबळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच आज जनतेच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच बोलले नाहीत आणि जाहीरनाम्यातून देखील भाजपने हे आश्वासन दिले नव्हते. हा विरोधकांनी केलेला अपप्रचार असल्याचं खासदार साबळे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS