राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवा, विधानसभेचं तिकीट मिळवा, काँग्रेसची भन्नाट योजना !

राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवा, विधानसभेचं तिकीट मिळवा, काँग्रेसची भन्नाट योजना !

कर्नाटकानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यात वर्षाअखेरीला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्या शेवटच्या निवडणूक असतील. त्यामुळे काँग्रेसनं आता भाजपला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. येत्या 6 जुनला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मध्यप्रदेशातील मंदसौर येथे जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. त्याची तयारी करण्यसाठी काँग्रेसने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये काँग्रेसचे मध्यप्रदेश प्रभारी संजय कपूर यांनी इच्छुक उमेदवारांसाठी एक आगळीवेगळी स्पर्धाच ठेवलीय.

राहुल गांधींच्या सभेला जो इच्छुक उमेदवार जास्तीत जास्त गर्दी जमवेल त्याला विधानसभेचं तिकीट दिलं जाईल अशी घोषणाच संजय कपूर यांनी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारंसमोर बोलताना केली आहे. जास्तीत जास्त गर्धी जमवणारांना विधानसभेचं तिकीट मिळेल. जे इच्छुक गर्दी जमवण्यात अपयशयी ठरतील त्यांना तिकीट मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. प्रत्येक इच्छुकाने आपल्या बॅनरसही गर्दी जमवण्याचे आदेशच संजय कपूर यांनी इच्छुकांना दिले आहेत. प्रत्येकानं जमवलेल्या गर्दीचं रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे असंही कपूर म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

राहुल गांधींच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी लढवलेली काँग्रेसची ही युक्ती किती फलदायी ठरते ते येत्या 6 जूनला स्पष्ट होईल. इच्छुक उमेदवार किती गर्दी जमवतात, काँग्रेस पक्ष त्याचे मोजमाप कसे करणार आणि कसे तिकीट वाटप करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. एक मात्र खरं की ज्याच्याकडे अमाप पैसा आहे. तोच गर्दी आणण्यात यशस्वी होणार हे वेगळं सांगायला नको. त्याने कार्यकर्ते आणले की भाड्याने लोक जमवले हे काही कळू शकणार नाही.

राजकीय पक्षाकंडून तिकीट वाटपाच्या वेळी निवडणू येण्याची क्षमता हा निकष वापरला जातो. मग त्याची प्रतिमा कशी आहे ? तो गुंड आहे की भ्रष्ट्र आहे याचा फारसा विचार झालेला दिसत नाही. आणि याला अपवादही कोणताच पक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या प्रकाराचे फारसे आश्चर्य वाटायला नको. आता  अशा प्रकारे केलेल्या तिकीट वाटपाचा पक्षाला किती फायदा होतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

COMMENTS