नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमधील दुरावा आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. आजपर्यंत नरमाईची भूमिका घेणा-या भाजपनं आता मात्र आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातल्या युती संदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात पार पडली. या बैठकीत शाह यांनी महाराष्ट्र में अगर अलायन्स बनाना हैं तो कुछ खोकर क्यू बनाएंगे? कुछ खोकर बिल्कुल नहीं होगा, काहीही गमावून महाराष्ट्रात युती होणार नसल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान युतीसंदर्भात शिवसेनेसाठी शेवटपर्यंत वाट पाहू मात्र कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याचीही भाजपाची तयारी आहे असंही शाह यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपच्या खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही शाह यांनी यावेळी दिले आहेत. आज अमित शाह यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेना-भाजपमधील दुरावा वाढत चालला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा दुरावा वाढणार की कमी होणार हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS