आशिष शेलारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला !

आशिष शेलारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला !

मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांचं नाव न घेता शेलार यांनी हा सल्ला दिला असून लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी”पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात,त्यांना प्रथम राष्ट्र, मग पक्ष, आणि शेवटी मी, अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजणं थोड अवघडच असणार, वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही, आमच्या शुभेच्छा असं ट्वीट शेलार यांनी केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या सुरवातीलाच मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मोदीच मोदींची मुलाखत घेत असल्याचे या व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे. यानंतर लोकांच्या प्रश्नांपेक्षा ‘मी’पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात, त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष ! आणि शेवटी मी !! अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!! असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

 

COMMENTS