अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट, युतीबाबत चर्चा करणार ?

अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट, युतीबाबत चर्चा करणार ?

मुंबई – शिवसेनेने भाजपासोबतच रहावे ही आमची इच्छा असल्याचं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. तसेच अमित शाह याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या भेटीमध्ये ते आगामी निवडणुकीत एकत्र येण्याबाब चर्चा करणार असल्याचीही शक्यत वर्तवली जात आहे. शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला असून त्यामुळे शिवसेना आणि भाजपा जर वेगळे लढले तर त्याचा तोटा दोन्ही पक्षांना होणार होऊ शकतो याचाच विचार करुन अमित शाह यांनी एक पाऊल पुढे टाकणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना अमित शाह यांनी शिवसेना सोबत असावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. तसेच याबाबत ते उद्ध ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीला भेट देतात ही परंपरा आहे. दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांशी युती करूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा भाजपाचा मानस आहे. परंतु उद्धव ठाकरे हे याबाबत काय निर्णय घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS