गुजरातमधील भाजपच्या गुजरात गौरव यात्रेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या समारोपाच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या आधी अमित शहा यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख केला. त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं नाव घेतलं. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल याचं नाव घेतलं. मात्र हे नाव घेत असताना त्यांनी श्री नितीन पटेल असं म्हणण्याऐवजी श्रीमती नितीन पटेल असं म्हटलं. त्यामुळे सगळेच गोंधळून गेले. चूक लक्षात येताच त्यांना हसू आलं आणि स्टेजवरही सर्वजण हसले. चूक दुरस्त करत शहा यांनी श्री नितीन पटेल असं म्हटलं. शहा यांना नितीन पटेल यांच्या आधी आनंदीबेन पटेल याचं नाव घ्यायचं होतं. मात्र त्यांनी नितीन पटेल यांचं नाव घेतलं आणि सगळा गोंधळ झाला.
COMMENTS