पत्रकार परिषदेचे अपडेट्स लाईव्ह….
पत्रकार परिषद संपली
भाजप शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 जागा जिंकेल – अमित शाहा
तमाम हिंदू या क्षणाची वाट पाहत होता तो आला आहे – उद्धव ठाकरे
ज्यांच्या विरोधात 50 वर्ष लढलो, त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का या भूमिकेतून आम्ही एकत्र आलो – उद्धव ठाकरे
भाजप लोकसभेच्या 25 जागा लढणार, शिवसेना 23 जागा लढवणार – मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांशी चर्चा करु त्यांना जागा दिल्यानंतर राहिलेल्या जागा भाजप आणि शिवसेना अर्ध्या अध्या वाटून घेणार – मुख्यमंत्री
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प इतर ठिकाणी हलवला जाणार – मुख्यमंत्री
तांत्रिक कारणामुळे ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्या सर्वांना कर्जमाफी मिळेल यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री
राम मंदिरासाठी आणि शेतक-यांसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत – मुख्यमंत्री
लोकसभा, विधानसभा आणि सर्व निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र आलो आहोत. जनभावनेचा आदर करुन एकत्र आलो आहोत – मुख्यमंत्री
पत्रकार परिषदेत अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीने पत्रकार परिषदेसाठी रवाना
मातोश्रीवरील बैठक संपली, आता थोड्याच वेळात वरळीतल्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद
शिवेसनेला ईडी कारवाईची भिती घातल्यामुळेच शिवसेना युतीसाठी तयार झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
मातोश्रीवर बैठक सुरू
अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर दाखल,
युतीच्या महत्वाच्या घडामोडीसाठी बैठकांना आणि पत्रकार परिषदेसाठी एकनाथ खडसेना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा. 2014 मध्ये युती तोडण्चायी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे खडसेंना दूर ठेवल्याची चर्चा आहे.
…………………………………………………………
घटस्फोटानंतरच्या संसाराला अटलजी, बाळासाहेबांचा आधार !
मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीत घटस्फोट घेतल्यानंतर आता पुन्हा शिवसेना आणि भाजपचा एकत्र संसार सुरु होतोय. गेल्या साडेचार वर्षात दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाण्यात पाहिलं आणि एकमेकांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा उल्लेख अफजलखान असा केला होता. एवढच नाही तर उद्धव यांनी चौकीदार चोर आहे असाही हल्लाबोल केला होता. तर फडणवीसांनी सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीती दात ही जात अमुची अशी गर्जना केली होती. त्यामुळे आता युती झाल्यानंतर जनतेला आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय सांगायचे असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पडलाय.
या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दोन्ही पक्षांनी अटलजी आणि बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याचा प्रय़त्न सुरू केला आहे. कारण पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पहिल्यांदाच अटलजी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा एकत्र लावण्यात आल्या आहेत. त्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आली आहे. बाळासाहेब आणि अटलजी यांनी सुरू केलेली ही युती आहे. मधल्या काळात काही वाद झाले मात्र बाळासाहेब आणि अटलजींच्या विचारांवरची युती पुन्हा करत आहोत असं दाखवण्याचा दोन्ही पक्षाच्या प्रयत्न आहे.
COMMENTS