शिवसेना-भाजप युतीचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा ?

शिवसेना-भाजप युतीचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा ?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या या युतीचा फायदा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला होणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनं सत्तेत असूनही भाजपवर अनेकवेळा टीका केली आहे. त्यामुळे विरोधकांची जागाही शिवसेनेने व्यापली होती. परंतु युती झाल्यामुळे विरोधकांचं होणारं मतविभाजन टाळलं जाणार असून याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होऊ शकतो अशी आशा या दोन्ही पक्षांना आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार आहे, तर विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतची घोषणा आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली जाणार आहे.

COMMENTS