मुंबई – शिवसेनेच उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. तसेच अमोल कोल्हे यांच्यासोबत बदलापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजपा सोडून पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे यश पाटील, किशोर पाटील, डॉ. हर्षल पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान अनेकांना प्रश्न पडला असेल की मी हा निर्णय का घेतला. तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं आणि ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पवारांचे हात बळकट करावे, मराठी माणसाचे हात बळकट करावे यासाठी मी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
देशपातळीवरची दिशा बदलत आहे. आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी आज हा निर्णय घेतला आहे. तसेच अजित दादांनी मला कायम मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आनंद होत आहे. कारण लहानपणी ज्या पवार साहेबांची छबी पाहता यावी म्हणून मागे पळत यायचो त्याच पवार साहेबांच्या पक्षात आज मी प्रवेश करतो याचा मला आनंद वाटत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
तसेच देशात अस्वस्थता आहे, तरुणाईला दिशा देण्याची गरज असून घर सोडून वेगळ्या घरात आलो असलो तरी या घरातील माणसे माझीच आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजपा सोडून पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे यश पाटील, किशोर पाटील, डॉ. हर्षल पवार, वरपे यांचेही पक्षामध्ये स्वागत. सर्व मिळून जोमाने कार्य करू. pic.twitter.com/xbzEqAPl6M
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 1, 2019
COMMENTS