मुंबई – एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याचं प्रकरण आता अंजली दमानिया यांना भोवणार असल्याचं दिसून येत आहे. कारण या प्रकरणी अंजली दमानिया सुनावणीला कोर्टात गैरहजर राहिल्यामुळे रावेर कोर्टानं दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याचा अंजली दमानिया यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणाचा खटला रावेर कोर्टात आहे. दरम्यान, याप्रकरणी अंजली दमानिया वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान रावेर न्यायालयात भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयात जून २०१७ मध्ये दावा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीत दमानिया सातत्याने गैरहजर राहिल्याने रावेर न्यायालयाने त्यांचे अटक वॉरंट काढले आहे.तसेच यापूर्वीदेखील अंजली दमानियांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. मात्र अंजली दमानिया यांच्या प्रकृती अस्वास्थासह त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचे अटक वॉरंट थांबवण्यात आले होते. परंतु रावेर न्यायालयानं आता दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यामुळे अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
COMMENTS