मुंगीवर पाय पडले तर मुंगी चावते, मी तर बलाढ्य नेता – चंद्रकांत पाटील

मुंगीवर पाय पडले तर मुंगी चावते, मी तर बलाढ्य नेता – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात गेल्या २० वर्षात कोणी कोणी सरकारी जागा कशा बळकावल्या याच्या खोलात जाणार असल्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल परिसरात आसणारे अतिक्रमण काढायला चंद्रकांतदादा पाटलांनी विरोध केला आसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी हा इशारा दिला असून मी आत्ता स्वस्त बसणार नाही. कोणी खोटे आरोप करत असतील त्याना कोर्टात खेचणार असून मुंगीवर पाय पडले तर मुंगी चावते, मी तर बलाढ्य नेता असल्याचंही चंद्रकांदादा म्हणाले आहेत.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहरातील अतिक्रमण काढायला विरोध केला असून अतिक्रमण धारकांना ते पाठबळ देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आता कार्कमक भूमिका घेतली असून विनबुडाचे आरोप करणाऱ्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी गर्भित इशारा दिला आहे. आत्ता बिनबुडाचे आरोप करणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यावर आरोप करणा-यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS