अहमदनगर- विविध मागण्यांवरुन सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आज सकाळी ११ च्या सुमारास राळेगणसिद्धी येथे यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर उपोषणास सुरूवात केली आहे. परंतु वय आणि तब्येत पाहता अण्णांनी उपोषण मागे घ्यावे असं वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुमारे ८० ते ९० टक्के मागण्या या मान्य झाल्या आहेत. अजूनही त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. तरीही अण्णा उपोषणावर ठाम आहेत. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत अण्णांची भेटू घेऊ. त्यांच्या उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील असही यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे हे बेमुदत उपोषणास बसले आहेत. लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
#Maharashtra: Anna Hazare begins his fast for the formation of Lokpal at the Centre and Lokayuktas in the states, at Ralegan Siddhi. pic.twitter.com/mICrZoq9xt
— ANI (@ANI) January 30, 2019
मुख्यमंत्री ही आता लोकायुक्ताच्या कक्षेत येतील. असे करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. म्हणजे अण्णांची ही पहिली मागणी सरकारने मान्य केली. त्यांची दुसरी मागणी स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीची होती. शेतमालाला दीडपट दराची मागणी त्यांनी केली होती. सध्या आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देतोच. अण्णांच्या सुमारे ८० ते ९० टक्के मागण्या मागन्य झाल्या आहेत. उर्वरित ज्या मागण्या आहेत. त्याही लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे त्यांनी उपोषणास बसू नये, अशी विनंती महाजन यांनी केली होती.
COMMENTS