काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मोठा बदल, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला 6 जागा देणार ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मोठा बदल, प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला 6 जागा देणार ?

उस्मानाबाद – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मोठा बदल करण्यात आला असून  प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला 6 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेत एक पाऊल पुढ पडलं असल्याचं दिसत आहे. काल काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती.  या चर्चेत वंचित आघाडीला 6 जागा देण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादी दाखवली असल्याची माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे अकोल्याची एकच जागा सोडू अशी भूमिका घेणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेत हा मोठा बदल झाला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध होता. त्यामुळे एमआयएम नको असेल तर मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार असल्याचं एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महाआघाडीचा मार्ग मोकळा झाला होता.त्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं मोठा बदल करत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला 6 जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS