अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित

अहमदनगर : शेतकरी प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनी रामलिला मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मागितली होती. पंरतु दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने त्यांनी परवानगी नाकारली. दरम्यान, अण्णांनी राळेगणसिध्दीमध्ये आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यानंतर भाजपच्यावतीने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी वारंवार भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली. अखेर आज अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनास स्थगिती दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेत उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले.

यावेळी फडणवीस म्हणाले, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अण्णा हजारे यांनी 30 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने त्यांचा आग्रह होता. मागच्या काळात ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना दिलेला आश्वासनांची बऱ्यापैकी पूर्तता झाली. विशेष: त्याच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेज आणि इतर कामांसाठी 6 हजार कोटी दिला, त्यांना दिलेल्या आश्वासनानंतरच केंद्र सरकारने किसान सन्मान निधी सुरु केला, जीएसटी कमी केला, असे अनेक मुद्दे त्यावेळी घेण्यात आले. काही अजून मुलभूत मुद्दे ज्या मुद्द्यांसंदर्भात त्यावेळी सूचित करण्यात आले होते की, उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून निर्णय घेतला जाईल. दुर्देवाने निवडणूक आणि कोरोनामुळे घेता आला नाही. पण आता समिती गठीत करुन सहा महिन्यात निर्णय होईल”, असे सांगितले.

COMMENTS