भाजपला धक्का, आणखी एक घटकपक्ष एनडीएतून बाहेर !

भाजपला धक्का, आणखी एक घटकपक्ष एनडीएतून बाहेर !

पाटणा – भाजपला जोरदार धक्का बसला असून आणखी एक घटकपक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे. त्यामुळे दिवशेंदिवस देशात कुठेतरी भाजपचं वजन यामुळे कमी होत असताना दिसत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी एनडीएतून बाहेर पडले आहेत. बिहारमधील विरोधी पक्षातील नेत्या राबडी देवी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जीतन राम मांझी यांनी ही घोषणा केली आहे. बिहारमधील महायुतीत गुरुवारी सहभागी होणार असल्याचं जीतन राम मांझी यांनी सांगितलं. मंगळवारी आरजेडी नेते भोला यादव यांनी जीतन राम मांझी यांना आरजेडीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर माझी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला मोठा धक्का मानलं जात आहे.

दरम्यान बिहारमध्ये विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या एका जागेवर 11 मार्च रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जागावाटपावरुन जीतन राम मांझी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. या निवडणुकीसाठी मांझी यांनी जहानाबादच्या जागेसाठी तिकीट मागितलं होतं. परंतु त्यांच्या पक्षाला तिकीट मिळालं नसल्यामुळे मांझी यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS