नवी दिल्ली – लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. भाजपकडूनही उमेदवार निवडीची मोहीम सुरु आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी नमो अॅपचा वापर करत आहेत. या अॅपमुळे अनेक खासदारांची झोप उडाली आहे. कारण मोदींनी नमो अॅपच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख नेत्यांची नावं सुचवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. यासाठी नमो अॅपवर ‘पीपल्स पल्स’ नावानं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना या माहितीचा आधार पंतप्रधान मोदी घेणार आहेत. त्यामुळे अनेक खासदारांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान अधिकाधिक लोकांनी नमो अॅपवरील सर्वेक्षणात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. यासाठी मोदींनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. ‘तुमचा अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दिलेल्या अभिप्रियांमुळे अनेक निर्णय घेताना आम्हाला मदत होईल,’ असं आवाहन मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं.
त्यामुळे या अॅपवरील प्रतिक्रियानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी आपआपल्या मतदारसंघातून प्रत्येक खासदाराला अॅपवर लोकप्रिय होणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेक खासदारांच्या चिंतेत भर पडली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS