नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकण्यात आली होती. हे प्रकरण ताज असतानाच आता पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण याबाबत दिल्ली पोलिसांनी केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत दिल्ली पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत असून मोहम्मद इमरान (वय – 39) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलगी गोळी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
त्याच्यासोबत 12 अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात गेले होते अशी माहिती आहे. पोलिसांच्या तपासानंतरच यामागचं कारण समोर येणार आहे.
COMMENTS