सर्वपक्षीय नेत्यांची बैठक फिस्कटली, विरोधकांची आक्रमक भूमिका !

सर्वपक्षीय नेत्यांची बैठक फिस्कटली, विरोधकांची आक्रमक भूमिका !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी विधीमंडळात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आरक्षणाचा अहवाल मांडावा या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. सरकार मात्र अहवालाऐवजी एटीआर मांडणार आहे. त्यामुळे सरकारची भूमिका विरोधकांना मान्य नाही. त्यामुळे कोणताही तोडगा न निघताच ही बैठक संपली आहे. तर पुढील भूमिका ठरवण्यासाठी विरोधकांनी बैठक घेतली आहे.

दरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज बंद ठेवण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दुसर्‍यांदा तहकूब करण्यात आलं होतं. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे.

परंतु विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून अहवाल सादर न करताच विधेयक मांडण्याला त्यांनी विरोध दर्शवला होता. तसेच सभागृहात गोंधळ घालत जोपर्यंत अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

 मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत, त्यामुळे यामध्ये विरोधकांनी अडथळा आणू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS