आशिष शेलार आणि राज ठाकरेंमधील भेटीत ‘या’ विषयावर झाली चर्चा?

आशिष शेलार आणि राज ठाकरेंमधील भेटीत ‘या’ विषयावर झाली चर्चा?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज येथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेतत.

दरम्यान राज ठाकरे २३ जानेवारी रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणार असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली असल्याची चर्चा आहे.

COMMENTS