अशोक चव्हाणांची शिवसेनेवर जोरदार टीका,” शिवसेनेची ‘ती’ जुनीच दुकानदारी !”

अशोक चव्हाणांची शिवसेनेवर जोरदार टीका,” शिवसेनेची ‘ती’ जुनीच दुकानदारी !”

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने मुंबईतील दुकांनावर मराठी पाट्या बसवण्याबाबत इशारा दिला होता. याबाबत चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून मराठीचा मुद्दा पुढे करून असे इशारे देणे ही शिवसेनेची जुनीच दुकानदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.तसेच हा लोकांना त्रास देण्याचा प्रकार असून हे फार काळ चालणार नसल्याचंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोक आता समजदार झाले असून शिवसेनेने कितीही प्रयत्न केला तरी या मुद्द्याचा राजकीय फायदा शिवसेनेला घेता येणार नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली असून आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान या दोन्हींचा अवमान असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS