राज्यातील ‘या’ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

राज्यातील ‘या’ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

मुंबई – राज्यातील ६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वडगाव, जळगावमधील मुक्ताईनगर, अकोल्यातील बार्शीटाकळी, नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी आणि पारशिवनी नगरपरिषदांसाठी १५ जुलै रोजी मतदान, तर १६ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या या कार्यक्रमामुळे आता सर्वच पक्षीय निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आज राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील 6 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्र जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर, वडगाव, जळगावमधील मुक्ताईनगर, अकोल्यातील बार्शीटाकळी, नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी आणि पारशिवनी नगरपरिषदांसाठी १५ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १६ जुलै रोजी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

COMMENTS