कर्जत – भाजपचे नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे नेते आणि प्रथम नगराध्यक्ष असलेले नामदेव राऊत हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील समर्थकांचा ९ सप्टेंबरला कर्जतमध्ये संकल्प मेळावा आयोजित केला आहे. त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीची भूमिका जाहीर करणार आहेत. राऊत निवडणुकीत उतरल्यास राम शिंदे यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भाजपने विजय मिळवला आहे.पालकमंत्री राम शिंदे यांच्या विजयातही राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे. त्यावेळी राऊत समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. मोठे शक्तीप्रदर्शन राऊत यांनी केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर भाजपात प्रवेश केला होतो. मुंडे यांनी त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासनही त्यावेळी दिलं होतं. त्यामुळे भाजपाने आपल्याला आता उमेदवारी दिली नाही तर आपण पर्याय शोधणार असल्याची भमिका राऊत यांनी घेतली असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS