अजित पवारांचा सावध पवित्रा, “अध्यक्ष महोदय तुम्ही वाकून बघताय, त्यांनी झाकून ठेवायची गरज नव्हती !”

अजित पवारांचा सावध पवित्रा, “अध्यक्ष महोदय तुम्ही वाकून बघताय, त्यांनी झाकून ठेवायची गरज नव्हती !”

नागपूर – मुसळधार पावसाचा फटका आजपर्यंत पहिल्यादाच पावसाळी अधिवेशनाला बसला असल्याचं 6 जुलै रोजी पहावयास मिळालं. विधीमंडळात साचलेल्या पाण्यामुळे त्यादिवशीचं कामकाज ठप्प करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सुरु झालेल्या कामकाजादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तुंबलेले पाणी पाहतानाचा फोटो व्हायरलं झाला होता. हे अत्यंत चुकीचे असून हा सभागृहाचा अवमान असल्याचं पवार यांनी म्हटलं. यावर हरिभाऊ बागडे हे चिडले आणि त्यांनी आपत्कालीन परिस्थिती धावून जाणे हे काम नाही का असा सवाल त्यांनी अजितदादांना केला.

दरम्यान यावर पवार यांनी सावध पवित्रा घेत मला तसं म्हणायचं नव्हतं परंतु अध्यक्ष महोदय तुम्ही वाकून बघताय, त्यामुळे दुसऱ्यांनी झाकून ठेवायची गरज नव्हती असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे तरूण वयात नागपूरचे महापौर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्त्यांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत. तरीही नागपुरात जलमय स्थिती होते. हा प्रकार बरोबर नाही. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

 

COMMENTS