नवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले. त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातील नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ व अन्य नेते उपस्थित आहेत. तसेच थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून अंत्ययात्रेत सुमारे ५ लाख लोक येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. त्यामुळे त्यांचं अखेर काल निधन झाले.
COMMENTS