…तर ‘मी’ भाजपची साथ आणि मंत्रिपद सोडतो – रामदास आठवले

…तर ‘मी’ भाजपची साथ आणि मंत्रिपद सोडतो – रामदास आठवले

मुंबई – दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. परंतु आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले असा सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठेवले यांनी केला आहे. तसेच देशातील दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला तर मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नसल्याचं वक्तव्यही रामदास आठवले यांनी केलं आहे. झी 24 तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  ते बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना रिपाईंचं अध्यक्षपदही द्यायला तयार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा असून त्यासाटी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा असून युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा, अशी अपेक्षाही यावेळी आठवले यांनी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS