बारामती – अट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर होत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. गावच्या राजकारणात मराठा समाजात दोन गट असतात. ग्रामपंचात निवडणूक असा किंवा इतर अनेक वेळा राजकारणातून एक गट दुस-या गटाला शह देताना या कायद्याचा आधार घेतो. अशावेळी त्यांच्या भांडणातून एक गट दुस-या गटावर केस करायला दलित समाजाला भाग पाडतो असंही आठवले म्हणाले.
या कायद्चाया गैरवापर होऊ नये असं सुप्रिम कोर्टाचं म्हणणं आहे. तेच आमच्या पक्षाच आहे असंही आठवले यांनी सांगितलं. या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी आमच्या पक्षातर्फे अनेकवेळा प्रयत्न केले गेले असाही दावा त्यांनी केला. दलित समजानेही मराठा समाजाच्या हातातील भावलं न बनता ज्यावेळी खरोखर अन्याय झाला असेल तेंव्हाच या कायदाचा आधार घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं. भारिप आणि आरपीआय युतीबाबत बोलताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची तयारी असल्यास आपण दोन पावलं मागे घेण्यास तयार असल्याचं सांगत त्यांनी दलित ऐक्यासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवलीय.. नाणार प्रकल्प झाला तरच स्थानिकांचा विकास होणार असल्यानं या प्रकल्पाला आपला पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलंय.
भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांना अटक होत नसल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी भिडे यांच्याबद्दल पुरावे सापडत नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र संभाजी भिडे हे गेल्या अनेक दिवसात वेगवेगळी बेताल वक्तव्य करतायत.. यापूर्वी आम्ही दलित पँथरमध्ये असताना आम्हाला कारवाईला सामोर जावं लागलं.. त्यामुळं संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालावी अशी मागणी आठवले यांनी केलीय.
COMMENTS