शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली – भाजप आमदार अतुल भातखळकर

शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली – भाजप आमदार अतुल भातखळकर

मुंबई – शेतकरी कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली  असल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी याबाबतचा दावा एक पत्रक काढून केला असून यामध्ये त्यांनी राज्याच्या आर्थिक हलाखीसाठी शेतकरी कर्जमाफीला जबाबदार धरले आहे. महसुली तूट ही शेतकरी कर्जमाफीमुळे झाली असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अतुल भातखळकर यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत वित्त आयोगालाच दोषी धरले असून राज्याची बाजू मांडताना वित्त आयोगाचे निष्कर्ष चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या राज्याच्या अंगावर कर्जाचा बोजा वाढला असून हा बोजा शेतकरी कर्जमाफीमुळे वाढला असल्याचं भातखळकर यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भातखळकर यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती सुधारली असल्याचा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्ते केला आहे.

COMMENTS