विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवेंचा मार्ग सुकर, आणखी एका पक्षाचा पाठिंबा?

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवेंचा मार्ग सुकर, आणखी एका पक्षाचा पाठिंबा?

औरंगाबाद – औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांच्यात ही लढत होत आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे यांचा मार्ग सुकर झाला असल्याची चर्चा आहे. कारण या निवडणुकीत एमआयएमनं शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमआयएम आणि शिवसेनेच्या नेत्यांची काल रात्री गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत एमआयएमच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती आहे.

दरम्यान या निवडणुकीत ६५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३८४ मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तर जालना जिल्ह्यात एकूण २७२ मतदार आहेत. त्यात जालना जिल्हा परिषद ६४, भोकरदन- २०, जाफराबाद- १९, जालना न.प. ६७, बदनापूर १९, मंठा- १९, घनसावंगी – १९, परतूर- २३ आणि अंबड २२ असा समावेश आहे. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार असतात. या मतदानाची २२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

COMMENTS