औरंगाबाद – एमआयएम नगरसेवकांचा महापालिकेत राडा

औरंगाबाद – एमआयएम नगरसेवकांचा महापालिकेत राडा

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसधारण सभेत आज पाण्याच्या प्रश्नावरून एमआयएच्या नगरसेवकांनी चांगलाच राडा घातला. गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला ही एमआयएमच्या नगरसेवकांनी मारहाण केली. या गोंधळ घालणाऱ्या दोन नगरसेवकांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे.
शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत असताना नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात आली. जेवढी वसुली होते त्या पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा असे शिवसेनेकडून सूचित करण्यात आले. यावर एमआयएमकडून आक्षेप घेण्यात आला. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.  एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी पुढे आल्याने सुरक्षारक्षक पुढे सरसावले. त्यावेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर खान यांनी त्यांना पाठीमागे लोटत खुर्च्या फेकल्या. झटपट सूरू असताना महापौर आसन सोडून सुरक्षारक्षकाकडे गेले असता फेकलेली खुर्ची त्याच्या अंगावर पडली. या घटनेमुळे जफर खान आणि सय्यद मातीन यांचे नगरसेवक पद कायमसाठी रद्द करण्यात आले आहे.

 

COMMENTS