कोल्हापूर – आजरा नगरपंचायतीवर भाजप पुरस्कृत आजरा विकास आघाडीनं बाजी मारली असून या नगरपंचायतील ज्योत्स्ना चराटी यांना पहिल्या नगराध्यक्षा म्हणून मान मिळाला आहे. या निवडणुकीत आजरा विकास आघाडीला 9, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनेलला 6, तर परिवर्तन पॅनेलला 1 आणि एका अपक्ष उमेदराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीनं निकराचे प्रयत्न केले होते.
दरम्यान नगराध्यक्षासह 17 नगरसेवकपदांच्या जागांकरिता मोठ्या चुरशीने निवडणूक पार पडली. भाजप व मित्रपक्षांची ताराराणी आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी व परिवर्तन विकास आघाडी अशा तीन आघाड्यांमध्ये कमालीच्या चुरशीने लढत झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी तिन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला होता. परंतु भाजपची आजरा विकास आघाडी वगळता इतर आघाड्यांचा पराजय झाला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा दावा फोल ठरला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS