पक्षनेतृत्वाला न सांगताच केंद्रीय मंत्री गिते उपोषणाला बसले, शिवसेनेत खळबळ !

पक्षनेतृत्वाला न सांगताच केंद्रीय मंत्री गिते उपोषणाला बसले, शिवसेनेत खळबळ !

दिल्ली – संसदेत कामकाज न होऊ दिलेल्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे आमदार आणि खासदार देशात विविध ठिकाणी उपोषणाला बसले. या उपोणाला शिवसेनेचा विरोध असतानाही शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते हेही उपोषणाला बसले. शिवसेनेचा कोणताही नेता किंवा आमदार उपोषणाला बसला नाही. तरीही गिते उपोषणाला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गिते यांनी तातडीने उपोणाचे ठिकाण सोडावे असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात आहेत. उद्धव ठाकरे परतल्यानंतरच या प्रकरणावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. गिते यांच्या या कृत्यामुळे शिवसैनिक आणि पक्षप्रमुख चांगलेच संतापल्याचं बोललं जातंय. एकीकडे शिवसेनेला न विचारताच किंवा शिवसेनेचा विरोध डावलून कालच नाणार प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधिच भाजपवर प्रचंड नाराज असलेल्या शिवसेनेचा पारा आणखीनच चढला आहे. अशात आता गितेंनी भाजपच्या व्यासपिठावर हजेरी लावल्याने शिवसैनिक आणि पक्षप्रमुखांच्या नाराजीत भर पडण्याची शक्यता आहे. त्याचे काय परिणाम होतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

सामनातून भाजपच्या उपोषणावर जोरदार टीका करण्यात आली आहे. असं असतानाही गिते भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. माध्यातून याबाबतचं वृत्त आल्यानंतर त्यांनी तिथून काडता पाय घेतला. सामनातून व्यक्त झालेली भूमिका ही शिवसेनेची नाही. केंद्रातला मंत्री म्हणून आपण विरोधकांचा निषेध करण्यासाठी उपोषणाला बसल्याचं गिते यांनी सांगितलं.

COMMENTS