मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. बच्चू कडू यांनी रक्तदान करुन मंत्रालयात पदभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी जनतेला दान करुनच जनतेची सेवा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मंत्रालयात दालन मिळालं नाही, तर गांधींच्या पुतळ्याखाली बसून काम करेन, असं म्हणत बच्चू कडू यांनी मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतरही आपल्या साधेपणाचं दर्शन घडवलं आहे.
दरम्यान कॅबिनेटपद नाही मिळालं, तर काय झालं? मोठी खाती मिळाली आहेत, त्या खात्यातील कामं करेन, मला विविध खात्यांची जबाबदारी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करेन, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तसेच सिंचन हे महत्त्वाचं खातं आहे. अनेक फायली अधिकाऱ्यांनी दाबून ठेवल्या आहेत. जर त्यांनी काम केलं नाही, तर कायदा मोडून काम करु, तुरुंगात जायलाही तयार असल्याचे बच्चू कडू म्हणालेत.
COMMENTS