चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेल्या या कॅबिनेट मंत्र्याची पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजरी!

चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेल्या या कॅबिनेट मंत्र्याची पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजरी!

मुंबई – चांगले खाते मिळाले नाही म्हणून राज्य सरकारमधील काही मंत्री अजूनही नाराज असल्याची चर्च सुरु आहे. कारण कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याची पूर्वीपासूनच चर्चा होती. परंतू आज पहिल्याच बैठकीला ते गैरहजर राहिले असल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दरम्यान विजय वडेट्टीवार यांना इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. परंतु ते नाराज असल्याची चर्चा आहे. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. ‘आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजरी लावली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी दूर करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS