अकोला – शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू अशी धमकी आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिली दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यास उशीर केल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरलं. पुढच्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अकोल्यातील मुक्काम मोर्चादरम्यान बोलत होते.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. सरकारने मागण्या पूर्ण करण्यासाठी 20 दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सहा दिवसांचा अवधी दिला आहे. 19 ते 24 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा असा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. तसेच शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्यात दंगली निघतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
COMMENTS