उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया!

उमेदवारी मिळाल्यानंतर बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया!

बीड, पाटोदा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली असून पक्षाने दिलेली उमेदवारी जनतेच्या ताकदीवर पेलण्यास मी तयार असून, जनतेचा पाईक म्हणुन जिल्हा वासियांच्या प्रश्नांवर आवाज उठवेल त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जमतेला केले आहे.

तसेच यावेळी माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी भाजपवर टीका केली. शेतमालाचा भाव पाडण्याचा चमत्कार करणार्‍या मोदी सरकारने केला. घोषणा अनेक केल्या कृतीत मात्र फसवले, अशा शब्दात माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी टीका करताना आष्टी, पाटोद्यात साखर कारखाना उभे करायला इथल्या माजी मंत्र्याला जमले नाही, ते बजरंग बप्पा सारख्या सामान्य कार्यकर्त्यांने करून दाखवले, असं म्हटलं आहे.

तर यावेळी शेतकर्‍यांची जाण असणार्‍या शेतकरी पुत्राचा मागे उभे रहा असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे यांनी केले. जातीवादी पक्षाला थारा न देण्याचे आवाहन माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. भाजपाचा टांगा पलटी करण्याचा निर्धार माजी सभापती महेंद्र गर्जे यांनी व्यक्त केला तर रात्रीचा दिवस करा आणि घड्याळ हेच चिन्ह समजुन निवडणुक लढवा असे आवाहन महिला जिल्हा अध्यक्षा सौ.चंपावती पानसंबळ यांनी केले.

COMMENTS