नाराजीबाबत अमरसिंह पंडित यांची प्रतिक्रिया!

नाराजीबाबत अमरसिंह पंडित यांची प्रतिक्रिया!

पाटोदा – उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित हे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उमेदवारीचा निर्णय झाला आहे, आता तयारीला लागा घड्याळ हाच उमेदवार समजुन बजरंग बप्पा यांना विजयी करा असे आवाहन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी करीत आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या सर्वच चर्चांना आज चोख प्रत्युत्तर पाटोदा येथील बैठकीत दिले.

तसेच मला पक्षाचा आदेश अंतिम आहे, दिलेला शब्द हा अमर पाळतो. बीड जिल्हा पवारांवर विश्वास ठेवणारा आहे. पक्षाचा निर्णय झाला आता कामाला लागा असा आदेशच कार्यकर्त्यांना देत उमेदवारीवरून उठलेल्या वावड्यांना पंडित यांनी चोख शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

या बैठकीय गुलाबराव घुमरे, जयसिंग सोळंके, अ‍ॅड.एन.एल. जाधव, अप्पासाहेब राख, जुबेरभाई चाऊस, बाबासाहेब शिंदे, इक्बाल पेंटर, कॉ.महोदव नागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, दादासाहेब मुंडे, श्रीहरी पवार, गणेश भोसले, काकासाहेब शिंदे, शिवाजी पवार, सुनिल काळे, विठ्ठल सानप, सुवर्णाताई शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS